Gorkha jawan Khukuri dance : भारतीय सैन्य (Indian Army) हे जगातलं सर्वात धाडसी सैन्यांपैकी एक मानलं जातं. ज्यांच्या शौर्याच्या कहाण्या वेळोवेळी देशवासीयांना मंत्रमुग्ध करण्याचं काम करतात. भारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट (Regiment) आहेत आणि प्रत्येकाच्या शौर्याच्या कथा वेगवेगळ्या आहेत. त्यापैकी एक गोरखा रेजिमेंट (Gorkha Regiment)… शूरतेचं दुसरं नाव. त्यांच्या शौर्याच्या कहाण्या जगभर प्रसिद्ध आहेत. या रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे. ही जगातल्या सर्वात धाडसी रेजिमेंटपैकी एक मानली जाते. आजच्या काळात बंदुका हे सैनिकांचं प्रमुख हत्यार बनलं असलं, तरी गुरखा जवानांसाठी खुकरी हे सर्वात महत्त्वाचं आणि पारंपरिक शस्त्र आहे. सध्या गोरखा जवानाचा एक खुकरी डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असले, तरी हा व्हिडिओ स्वतःच खूपच सुंदर आहे.
पारंपरिक नृत्य
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक तरुण कसा खुकरी घेऊन नाचत आहे. नाचताना तो ज्या पद्धतीनं खुकरी फिरवत असतो, त्याचा तोल, एकाग्रता आपल्या नजरेत भरतो. तो पारंपरिक पद्धतीनं अतिशय सुंदर असं नृत्य करतो.
ट्विटरवर शेअर
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘गोरखा जवानाचा खुखरी डान्स.! गुरखा सैनिकांविषयी असं सांगितलं जातं, की एकदा मैदानात उतरले की लढायचं ठरवूनच ते परततात.
लाइक्स आणि कमेंट्स
50 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 17 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1700हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की 26च्या परेडपेक्षा या सगळ्यांना अशा प्रकारे नाचताना आणि नाचताना पाहणे अधिक आनंददायी आहे’, तर दुसऱ्या यूझरनं असं म्हटलं, की मला मृत्यूची भीती वाटत नाही”. यासह विविध कमेंट्स केल्या आहेत.