Kid cute video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेळा असे अनेक व्हिडिओ समोर येतात जे आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवतात. विशेषत: निष्पाप मुलांशी संबंधित व्हिडिओ, लहान मुलांची गोंडस आणि बेफिकीर कृत्ये सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. अलीकडेच असा एक गोड (Cute) व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे. ज्यामध्ये सकाळच्या प्रार्थनेवेळी एक मुलगा असे काही करतो, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमचे बालपण नक्कीच आठवेल. व्हिडिओमध्ये (Video) लहान मुलांची लॉलीपॉप (Lollipop) खाण्याची वेगळी पद्धत लोकांना खूप आवडली आहे. 30 सेकंदांच्या क्लिपमध्ये, एक लहान मुलगा शाळेच्या संमेलनात डोळे मिटून उभा राहून प्रार्थना करताना दिसत आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर असे दिसते, की मुलगा पूर्णपणे एकाग्र आणि प्रार्थनेत मग्न उभा आहे. परंतु जवळून पाहिल्यास असे दिसून येते, की त्याच्या हातात एक लोपीपॉप आहे, जे त्याने बोटांमध्ये लपवले आहे.
ट्विटर हँडलवर शेअर
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहणाऱ्याचे चांगलेच मनोरंजन करतो. मुलाची ही फनी स्टाइल लोकांना खूप आवडली आहे. हा मजेदार व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, की तुम्ही स्वतःशी रिलेट करू शकता. हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
‘लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या’
या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या लहान मुलाच्या निरागस जुगाडाने लोकांना त्यांच्या बालपणाची आठवण करून दिली, ते लहानपणी कसे गुपचूप लॉलीपॉप खायचे. एका यूझरने लिहिले, दास्तां–ए–मासूमियत..!तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.’ दुसऱ्या यूझरने लिहिले, इसे कहते हैं एक पंथ दो काज..!याशिवाय इतरही अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.