जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ
पालघर दि.27 : जिल्ह्यामधील आठ तालुक्यात 2 लाख 7 हजार 849 व्यक्तींचे लसीकरण करून जिल्ह्याने कमी कालावधीत दोन लाखाचा आकडा पार केला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले जिल्ह्यामध्ये एकूण 88 लसीकरण सत्र असून 71 शासकीय तर 17 खाजगी सत्रा मधून दैनंदिन साधारण 6 हजार 600 व्यक्तींना लस दिली जाते आतापर्यंत 1 लाख 74 हजार 645 जणांना पहिला डोस दिला गेला तर 32 हजार 204 जणांना दुसरा डोस देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
तालुकानिहाय लसीकरणा मध्ये डहाणू 18 हजार 558, जव्हार 4 हजार 443, मोखाडा 2281, पालघर 59 हजार 771, तलासरी 2485 वसई 13526, विक्रमगड 4235,पालघर ग्रामीण 1 लाख 16 हजार 181, वसई विरार 91 हजार 668, असे एकूण 2 लाख 7 हजार 849 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.