महाराष्ट्रातील ख्यातनाम शोधपत्रकार गोविंद तुपे Govind Tupe यांना 'न्यूज टेलिव्हिजन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशपातळीवर मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार तुपे यांना दिल्ली येथील हॉटेल हॉलिडे इन येथे इंडियन टेलिव्हिजनचे डायरेक्टर तुषार बनवारी यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला.
तुपे सध्या 'झी २४ तास' या मराठी न्यूज चॅनेलमध्ये 'सीनिअर स्पेशल करस्पाँडंट' या पदावर कार्यरत आहेत. तुपे यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात 'Ibn लोकमत' या वृत्तवाहिनीमधून केली होती. त्यानंतर त्यांनी 'लोकसत्ता', 'सकाळ'सारख्या वृत्तपत्रातही विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे.याशिवाय साम टिव्ही, जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीमध्येही वरिष्ठ पत्रकार म्हणून जबादारी सांभाळली आहे.
न्युज चॅनेल्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी गौरवण्यात येते. यामध्ये स्पेशल इन्व्हेस्टीगेशन कॅटेगिरीमध्ये दिला जाणारा 'नॅशनल टेलिव्हिजन अॕवॉर्ड' हा पुरस्कार गोविंद तुपे यांना बहाल करण्यात आला आहे. या पुरस्कार समारंभात देशभरातील प्रमुख उद्योजक, पत्रकारिता क्षेत्रातील मातब्बर मंडळी उपस्थित होती.
'सर्वसामान्यांचे प्रश्न आणि तळागाळातला माणूस' हा गोविंद तुपे यांच्या पत्रकारीतेचा केंद्रबिंदू राहिला आहे. खास करून तुपे यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या अनेक इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट्सला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये 'मुंबई प्रेस क्लब'चा 'स्टार रिपोर्टर रेड इंक अॕवॉर्ड', भारत सरकारचा 'मूकनायक', 'सकाळ' माध्यम समूहाचेचा 'नानासाहेब परुळेकर', कोल्हापूर येथील 'जगन फडणीस शोध पत्रकारिता' पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार, 'जनादेश' वृत्तवाहिनीचा 'कमाल खान शोध पत्रकारिता' अशा विविध पुरस्कारांनी तुपे यांना यापूर्वीही सन्मानित करण्यात आले आहे.