मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच फंगसने आता डोकेवर केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आले आहे. या परिस्थितीत राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा पाहायला मिळत असतात. (Air Purifier deactivate Corona and Fungus devloed IIT Mumbai and Kapur ) आता मुंबई आयआयटीकडून अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.
संशोधकांच्या दाव्यानुसार कोरोना व्हायरस आणि फंगस हे हवेमार्फत नाका आणि तोंडात जात आहे. यावर आयआयटी मुंबईकडून अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आयआयटी कानपूर आणि आयआयटी कानपूर यांनी मिळून एँटिमायक्रोबायल एअर प्युरिफायर तयार केलं आहे.
इनक्यूबेटर एअर्थ या संस्थेने एअर प्युरिफायर तयार केला आहे. या संस्थेचा असा दावा आहे की, या प्युरिफायरने कोणत्याही प्रकारचे जंतू, व्हायरस, फंगस, बॅक्टेरियाला डिऍक्टिव्हेट करता येणार आहे. आयआयटीच्या वैज्ञानिकांच्या देखरेखीखाली एँटिमायक्रोबायल एअर प्युरिफायर तयार करण्यात आला आहे. हा प्युरिफायर 600 स्क्वेअर फूटातील हवा व्हायरस आणि बॅक्टेरिया फ्री करतो.
एअर्थ कंपनीचे सीईओ रवी कौशिक यांच्या म्हणण्यानुसार, हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या आजुबाजूच्या हवेमध्ये व्हायरस मोठ्या प्रमाणावर असतो. हा व्हायरस बाहेर कसा काढायचा हा प्रश्न साऱ्यांनाच असतो. हा हवेतील व्हायरस मारण्याचे दोन पर्याय आहेत.
पहिला युव्ही लाईटचा वापर करून आणि दुसरा केमिकल स्पे करून. मात्र हे दोन्ही पर्याय तेथे पेशंट नसेल तेव्हाच वापरू शकतो. कारण हे दोन्ही मनुष्यासाठी अतिशय हानीकारक आहेत. त्यामुळे एअर प्युरिफायर हा अतिशय फायदेशीर असा पर्याय आहे. हे प्युरिफायर तीन गोष्टींवर आधारित आहे.
एअर प्युरिफायर फंगस, बॅक्टेरिया आणि व्हायरसला रिअल टाईम डिऍक्टिव्हेट करू शकते.
एअर प्युरिफायर संपूर्ण वेळ रूग्णाच्या आजूबाजूला सहज वापरू शकतो.
एअर प्युरिफायर सुरक्षित असून याचा शरीरावर कोणताही विपरित परिणाम होत नाही.
जिवंत विषाणू एअर प्युरिफायरमध्ये आल्यावर त्यांचे डिऍक्टिव्हेशन सुरू होते. यामध्ये विषाणू खास फिल्टरद्वारे पकडला जातो. त्यानंतर सिस्टिममध्ये हे व्हायरस डिऍक्टिव्हेट केले जाते. हे एअर प्युरिफायरचे टेस्टिंग दोन वेगवेगळ्या लॅबमध्ये करण्यात आले आहे. या एअर प्युरिफायरमुळे आजूबाजूची हवा 99 टक्के शुद्ध राहील असा दावा संस्थेने केला आहे.