वॉशिंग्टन : अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris)सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे जोरदार टीका होत आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन (Moon Jae-in) यांच्याशी हातमिळवणी केली. त्यानंतर कोणाला काही समजणार अशा पद्धतीने आपला हात त्यांनी कपड्यावर पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब कॅमेऱ्यात चित्रित झाली आणि हाच व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या या कृतीला दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा अपमान म्हणून पाहिले जात आहे.
व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर कमला हॅरिस (Kamala Harris)यांना सोशल मीडियावर लक्ष्य केले जात आहे. सोशल मीडिया वापरकर्ते, विशेषत: दक्षिण कोरियाचे लोक यास अपमानास्पद वागणूक देत आहेत, असे म्हटले आहे. कमला हॅरिस आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांच्यातील बैठक व्हाईट हाऊसमध्ये पार पडली. यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांना संबोधित केले. जेव्हा या दोघांनी सेकंटहॅण्ड केल्यानंतर कमला हॅरिस यांनी असे काही केले की तेच चर्चेच राहिले. हातमिळवणी केल्यानंतर त्यांनी आपल्या ट्राउझरवर हात पुरण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही नेत्यांनी कॅमेर्यासमोर हात दाखवले पण लवकरच कमला हॅरिस यांनी ट्राउझरने आपले हात पुसण्यास सुरुवात केली. त्यांचा हे असे कृत्य कॅमेऱ्यात चित्रित झाले असून आता त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच कमला हॅरिस यांच्यावर अपमानास्पद आणि लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप केला जात आहे. बर्याच Usersकडून याला वर्णद्वेषाची घटनाही म्हटले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की कमला हॅरिसने दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष मूनशी हात जोडल्यानंतर आपले हात पुसले! ही एक अत्यंत लाजीरवाणी घटना आहे.
अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी या बैठकीबद्दल सांगितले की मून जे इन यांच्याशी झालेल्या बैठकीत तिने जागतिक आरोग्य, उत्तर कोरिया आणि स्थलांतरितांविषयी चर्चा केली. यामध्ये मुख्यतः मध्य अमेरिकी देश ग्वाटेमाला, अल साल्वाडोर आणि होंडुरास येथून येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दादेखील समाविष्ट होता. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल त्यांनी अद्याप काहीही सांगितले नाही. तसेच त्यांच्या कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.