मुंबई : देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. देशात कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 14 हजार 460 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 लाख 89 हजार 232 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 2 हजार 677 रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या मंदावत असल्यामुळे दिलादायक वातावरण आहे.
देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,88,09,339 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,46,759 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 14,77,799 इतकी आहे. भारतात आतापर्यंत 23,13,22,417 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
दरम्यान राज्यात 5 जून रोजी 13 हजार 659 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. 13 हजार 659 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तर 24 तासात 21 हजार 776 रुग्ण बरे झाले आहेत. तर 300 जणांचा दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे राज्यात आज गेल्या 3 महिन्यानंतर सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. याआधी 10 मार्चला इतकेच म्हणजेच 13 हजार 659 नवे कोरोना बाधित सापडले होते.