मुंबई : कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर देशात लॉकडाऊन लावण्यात आला. यावेळी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध झालेला 'बाबा का ढाबा'चा (Baba ka Dhaba) मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याने नुकत्याच झालेल्या नुकसानीनंतर पुन्हा एकदा आपले नवीन रेस्टॉरंट बंद केले आहे. आणि ते आपल्या ढाब्यावर पुन्हा आले आहेत. गेल्यावर्षी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना लाखो रुपयांची मदत मिळाली, पण आता ते पैसे कुठे गेले असा सवाल लोक करीत आहेत.
'नवभारत टाइम्स'च्या अहवालानुसार 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद म्हणाले, माझ्या खात्यात किती पैसे आले हे मला आधी माहित नव्हते. सुमारे 45 लाख रुपये आले असल्याचे वृत्तपत्राच्या माध्यमातून समजले. पूर्वी ते 39 लाख होते, आता ते 45 लाख रुपये झाले आहेत.
अहवालानुसार आर्थिक मदत मिळाल्यानंतर कांता प्रसाद यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये एक नवीन रेस्टॉरंट उघडले, त्यासाठी त्यांनी सुमारे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. याशिवाय त्यांनी घराचा नवीन मजला बांधला, जुने कर्ज फेडले, स्वत:साठी आणि मुलांसाठी स्मार्टफोन विकत घेतले. याशिवाय रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या नुकसानीवरही पैसे खर्च केले गेले.
मोठ्या नुकसानीनंतर 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांचे नवीन रेस्टॉरंट फेब्रुवारीमध्ये बंद झाले आहेत. रेस्टॉरंटचा मासिक खर्च सुमारे 1 लाख रुपये होता, तर सरासरी मासिक विक्री कधीही 40,000 रुपयांपेक्षा जास्त नव्हती. कांता प्रसाद यांच्या खर्चामध्ये रेस्टॉरंटच्या भाड्यापोटी 35000 रुपये, तीन कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 36000 रुपये आणि रेशन, वीज आणि पाणी यासाठी 15,000 रुपये समाविष्ट आहेत. हळूहळू रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आणि रेस्टॉरंटचा खर्च वाढू लागला. यानंतर बाबांना त्यांचे रेस्टॉरंट बंद करावे लागले.
कांता प्रसाद यांच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत. त्या संदर्भात ते म्हणाले, 'माझ्याकडे फक्त 19 लाख रुपये शिल्लक आहेत. मला वाटते की नवीन रेस्टॉरंट उघडण्यासाठी चुकीचा सल्ला देण्यात आला होता आणि त्यात खूप नुकसान झाले. आता उर्वरित पैसे सुरक्षित भविष्यासाठी ठेवले आहेत.
गेल्यावर्षी, यू ट्यूबर गौरव वासन (Gaurav Wasan) यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद आणि बादामी देवी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर त्याचे नशिब बदलले होते आणि ढाब्यावर खाणाऱ्यांची रांग लागली होती. त्याशिवाय मोठ्या संख्येने लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले. मात्र, यानंतर त्यांनी युट्यूबवर फसवणूक केल्याचा आरोपही केला.
अजूनही गौरव वासन याच्याबाबत काही तक्रार आहे का? या प्रश्नावर कांता प्रसाद म्हणाले, गौरवने आम्हाला मदत केली आणि त्याने आमची फसवणूक केली, असे त्यांच्याबद्दल कसे म्हणता येईल. आम्ही फसलो आणि कागदावर सही केली. आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचे होते की खात्यात किती पैसे आले आहेत.