चंदीगड | कोरोना महामारीनं गेल्या दीड वर्षापासून थैमान घातलं आहे. या महामारीत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक लहान मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. त्यामुळे कोरोनानं तर मृत्यूचा तांडवच घातलेला पहायला मिळाला. अशातच आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाला मदतीची घोषणा पंजाब सरकारनं केली आहे.
कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या कुटुंबीयांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकार उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केली आहे.
पंजाब राज्य सरकार अजून मृतांची यादी तयार करत आहे. या यादीच्या आधारावर ते पीडित कुटुंबांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे आता कोरोनानं मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दिलासा देणारी बातमी आहे.
दरम्यान, देशात कोरोनाच्या बदलत्या रुपामुळे नागरिकांना तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे आता नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सरकारकडून कोरोना निर्बंधाचे काटोकोरपणे पालन करण्यास आवाहन केलं जात आहे.