देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर देशातील आणि जगभरातील लोक त्यांच्या भारतीय लष्करातील योगदानाला आदरांजली वाहत आहेत. सोशल मीडियावरही जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह अनेकजण शोक व्यक्त करत आहेत. बिपीन रावत यांना केवळ भारतीयच नाही तर पाकिस्तानातील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतीय लष्कराचे निवृत्त ब्रिगेडियर आरएस पठानिया यांनी एका ट्विटमध्ये सीडीएस बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिले की, सर तुम्हाला सलाम, जय हिंद. निवृत्त ब्रिगेडियरच्या या ट्विटवर उत्तर देत करताना, पाकिस्तानी लष्कराचे निवृत्त मेजर आदिल रझा यांनी, ‘सर कृपया माझ्या मनःपूर्वक संवेदना स्वीकारा,’ असे म्हटले आहे.
आदिल रझा यांच्या कमेंटला उत्तर देताना पठानिया यांनी आदिलचे कौतुक केले. पठानिया यांनी आदिल यांना ‘सैनिकाकडून हेच अपेक्षित असते. तुला सलाम, असे म्हटले आहे. निवृत्त ब्रिगेडियर पठानिया यांनी दिलेल्या उत्तरावर प्रत्युत्तर देताना अर्थात सर, एक सैनिक म्हणून ही चांगली गोष्ट आहे. सर तुमच्या नुकसानाबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व, असे म्हटले आहे.
आपल्या याच ट्विटमध्ये आदिल रझा पुढे म्हणाले की, आमच्या पंजाबी लोककथांमध्ये म्हटले आहे, दुश्मन मारे ते खुशियां न मनवू, कदय सजना वी मर जाना’ असे म्हटले आहे. आदिल यांनी त्याचा अर्थ पुढे स्पष्ट केला आहे. ‘तुमच्या शत्रूच्या मृत्यूचा आनंद साजरा करू नका कारण एक दिवस मित्रही मरतील असा त्याचा अर्थ आहे. यानंतर निवृत्त ब्रिगेडियरने पुन्हा एकदा आदिलचे आभार मानले आणि सांगितले की त्यांना पंजाबी भाषा समजते.
निवृत्त ब्रिगेडियर पुढे म्हणाले की, आम्ही युद्धभूमीवर शत्रू आहोत. तसेच, जर आपण मित्र होऊ शकत नसलो तर एकमेकांशी सौम्याने वागतो. यानंतर आदिलने पुन्हा दिलेल्या उत्तरात सर मी या सरांशी जास्त सहमत नाही, शांतता हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. आनंदी रहा सर, असे म्हटले. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडूनही शोक व्यक्त करण्यात आला होता.