सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जवानांच्या हौतात्म्याने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. एकीकडे देशभरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांचा श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दुसरीकडे काही कट्टरपंथी लोकांनी बिपिन रावत यांच्या निधनानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे केरळमधील मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शक अली अकबर खूप दुखावलेले गेले आहेत. अशा परिस्थितीत आता अली अकबर यांनी मुस्लिम धर्म सोडण्याची घोषणा केली असून लवकरच पत्नीसह हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. दिग्दर्शक अली अकबर यांनी फेसबुक लाईव्हवर ते इस्लामचा त्याग करत आहे असे म्हटले.
यापूर्वी अली अकबरने बिपिन रावत यांच्या हौतात्म्यावरुन एक फेसबुक लाइव्ह केले होते. ज्यावर काही धर्मांधांनी हसणारे इमोजी टाकले होते. यादरम्यान या लोकांनी सीडीएस रावत यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या या वृत्तीने अली अकबर यांच्या भावना दुखावल्या आहेत. फेसबुक लाईव्हवर येऊन त्यांनी याबाबत चर्चा केली. बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहताना अली अकबर म्हणाले की, “हे कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच मी माझा धर्म सोडत आहे. आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे.”
ज्यांनी एका शूर लष्करी अधिकाऱ्याचा अपमान केला आहे अशा देशद्रोह्यांच्या कृत्यांचा विरोध इस्लामच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांनी आणि राजकीय नेत्यांनीही केला नाही आणि ही गोष्ट मी स्वीकारू शकत नाहीत. माझा आता धर्मावरील विश्वास उडाला आहे. आज मी जन्मापासून मिळालेले कापड फेकून देत आहे. आतापासून मी मुस्लिम नाही. मी फक्त भारताचा नागरिक आहे. माझा हा निर्णय भारताविरोधात इमोजी पोस्ट करणाऱ्यांना प्रत्युत्तर आहे, असे अली अकबर यांनी म्हटले आहे.
अली अकबर यांनी या फेसबुक लाइफमध्ये बिपिन रावत यांच्यासाठी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या मुस्लिम युजर्सलाही फटकारले. त्याच वेळी, आता काही लोकांनी अली अकबरची जोरदार प्रशंसा केली.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये अकबर यांनी, देशाने सीडीएस यांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांची ओळख करून त्यांना शिक्षा केली पाहिजे, असे म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना अकबर म्हणाले की, सोशल मीडियावर अनेक देशविरोधी कारवाया सुरू आहेत आणि रावत यांच्या मृत्यूवर हसणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. जे लोक हसणारे इमोजी कमेंट करत आहेत आणि रावत यांच्या मृत्यूची बातमी साजरी करत आहेत ते बहुतेक मुस्लिम आहेत,” असे म्हणाले.
“बिपिन रावत यांनी पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात अनेक कारवाया केल्यामुळे त्यांनी हे केले. शूर लष्करी अधिकारी आणि देशाचा अपमान करणार्या या पोस्ट्स पाहिल्यानंतरही एकाही सर्वोच्च मुस्लिम नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. मी अशा धर्माचा भाग होऊ शकत नाही,” असेही त्यांनी पुढे म्हटले.