केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी, देशातील जास्तीत जास्त सरकारी प्रकल्पांना कोणत्या कारणांमुळे विलंब होत आहे याबाबत भाष्य केले आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील दिरंगाईबद्दल शोक व्यक्त करून, त्यांनी याबाबत मत व्यक्त केले. तसेच यामुळे प्रकल्पांच्या खर्चात अनेकदा वाढ होते असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतातील कामाच्या प्रणालीमुळे जास्तीत जास्त प्रकल्पांना विलंब होत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले. एससीएल इंडिया २०२१ परिषदेला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी याबाबत भाष्य केले आहे. “मला कोणावरही आरोप करायचे नाहीत, पण व्यवस्थेमुळे जास्तीत जास्त प्रकल्पांना विलंब होत आहे. मात्र व्यवस्थेमुळे जास्तीत जास्त प्रकल्पांना विलंब होत आहे. सरकारी यंत्रणेत निर्णय न घेणे आणि निर्णयांना उशीर होणे ही मोठी समस्या होती,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
गडकरी म्हणाले की, सर्वत्र निर्णय घेण्यास एवढा विलंब होतो की त्यामुळे प्रकल्पांची किंमत वाढते. “आम्हा सर्वांना माहित आहे की बांधकाम हे भारतातील एक प्रमुख रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. शेतीनंतर, आपल्या जीडीपीमध्ये योगदानाच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहे,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्राने २०२५ पर्यंत राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन कार्यक्रमाद्वारे सुमारे कोटींची तरतूद करून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे, असेही गडकरी म्हणाले. “पंतप्रधानांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. देशाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित समस्या सोडवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो,” असे गडकरी म्हणाले.
दरम्यान, भारत सरकार अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर पर्याय शोधत आहे. यासाठी सरकार गेली अनेक वर्षे बायोइथेनॉल आणि ग्रीन हायड्रोजन एनर्जीवर काम करत आहे. मात्र, त्यावेळी केंद्र सरकारचे हे नियोजन चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी वाटले नाही. मात्र या दिशेने सरकारला मोठे यश मिळाले आहे. सध्या सरकारने पायलट प्रोजेक्ट म्हणून ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारची ऑर्डर दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, लोकांचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये, पण ग्रीन हायड्रोजनवर धावणारी कार देशाची राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. गडकरी म्हणाले की, लोकांचा विश्वास बसावा यासाठी मी स्वत: त्या गाडीत बसेन.