कोल्हापूर : एकीकडे सर्व तरुणाई गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सेलिब्रेशनसाठी गोवा राज्यात गेलेली आहेत. मात्र, गोव्याचे मुख्यमंत्री नवीन वर्षाची सुरूवात सकाळी कोल्हापुरातील आई अंबाबाईचे दर्शनाने (Goa CM Visit Kolhapur) केली.
येत्या काही महिन्यात गोव्यात निवडणुका (Goa Assembly Election) होणार आहेत. त्यामुळे त्यांनी प्रचाराची सुरुवात आई अंबाबाईचे दर्शन घेऊन करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात अजून तरी कोणतेही नवीन निर्बंध केले नाहीत. मात्र, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना लसींचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहे. पुढे कोरोना रुग्ण वाढल्यास परत निर्बंध लावण्यात येतील असे प्रमोद सावंत म्हणाले.सकाळीच घेतले आई अंबाबाईचे दर्शनआई अंबाबाईला एरवी मी दरवर्षी येतच असतो.मात्र, कोरोनाच्या काळात गेली दोन वर्षे येऊ शकलो नव्हतो. फेब्रुवारीमध्ये गोव्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात मी कालच माझ्या मूळ गावातून केली आहे. मात्र पुढील प्रचार आई अंबाबाईच्या दर्शनी करत आहे. गोव्याच्या समृद्धी आणि विकासासाठी पुन्हा डबल इंजिनचे सरकार तेथे यावे आणि गोव्याच्या विकासासाठी पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी. अंबाबाईच्या आणि गोव्यातील तमाम देवांच्या आणि जनतेच्या कृपेने मिळावी. तसेच कोरोनामुक्त आणि समृद्धीयुक्त पद्धतीने गोवा पुढे घेऊन जाण्यासाठी सेवा करायची संधी मिळावी अशी प्रार्थना केल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.गोव्यात अद्यापतरी नवीन निर्बंध नाहीतगोव्यामध्ये फेब्रुवारीमध्ये विधानसभेची निवडणूक रणधुमाळी वाजली आहे. त्यांनी काल गोव्यात त्यांच्या मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केली आहे. खरी सुरुवात अंबाबाईची दर्शन घेऊन केली आहे गोव्यामध्ये पुन्हा भाजपचे सरकार येणार लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. गोव्यामधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही नवीन नियम केले नाहीत. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना दोन्हीही बंधनकारक करण्यात आले आहे. जर कोरोनाचे रुग्ण वाढल्यास निर्बंध लावण्यात येतील असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.जनता पोस्टरबाजीला फसणार नाहीगोव्यातील जनता जागरूक आहे. कोणीही पोस्टरबाजी केली तरी गोव्यातील लोक फसणार नाहीत. गोव्यातील लोक हुशार आहेत त्यांना माहित आहे. गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टीने गोव्यात किती विकास केला आहे. अजून पुढील ५ वर्ष विकास करण्यासाठी गोव्यातील जनता भाजपाला साथ देतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.