एका १६ वर्षीय मुलीवर तिच्या मृत्यूनंतरही आरोपींनी बलात्कार केल्याची क्रूर घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी २३ डिसेंबरपासून बेपत्ता होती. काही दिवसांनी तिचा मृतदेह आढळला होता. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या बुंदीमधून समोर आली आहे. मुलीचा शवविच्छेदन अहवाल पाहून पोलीस देखील घाबरले असून अशी क्रूर घटना आपण आयुष्यात कधीच पाहिली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत मृत अल्पवयीन मुलगी शेतात शेळ्या चारत असताना २३ डिसेंबर रोजी बेपत्ता झाली होती. तिच्यावर तीन नराधमांनी सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना प्रतिकार करताच त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. शवविच्छेदनात मुलीच्या गुप्तांगाला ३० पेक्षा अधिक जखमा असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी तिचे संपूर्ण शरीर ओरबाडून तिला जखमी केले होते. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुलीचा मृत्यू झाल्यानंतरही या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला.
शवविच्छेदन अहवालात असे समोर आले आहे की, आरोपींनी मुलीवर बलात्कार करण्यापूर्वी तिला तिच्या दुपट्ट्याने बांधले होते. बुंदीचे एसपी जय यादव म्हणाले: “मी माझ्या आयुष्यात अशी भयानक घटना पाहिली नाही. दरम्यान, बुंदी बार असोसिएशनच्या सदस्यांनीही ते न्यायालयात आरोपींचा बचाव करणार नाहीत, असे जाहीर केले आहे.”