भारतातील करोनाचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रविवारी नवीन करोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे गेला. एका दिवसात सापडलेल्या करोना बाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी १,५९,६३२ नवीन करोना रुग्ण आढळले. त्याच वेळी ४०,८६३ रुग्णही बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ३२७ मृत्यू झाले आहेत. दैनिक पॉझिटिव्हीटी रेट १०.२१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३,४४,५३,६०३ आहे. तर ४,८३,७९० लोकांना या संसर्गजन्य आजाराने आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत एकूण १५१.५८ कोटी इतके लसीकरण करण्यात आले आहे.
त्याच वेळी, देशातील ओमायक्रॉनच्या ३६२३ प्रकरणांपैकी १४०९ लोक बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या १००९ रुग्णांपैकी ४३९ लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, दिल्लीतील ओमायक्रॉनच्या ५१३ प्रकरणांपैकी ५७ लोक बरे झाले आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. दिल्लीत शनिवारी करोनाग्रस्तांनी २० हजारांचा आकडा पार केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ९० हजार ६११ झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८३ हजार ७९० झाली आहे. आकडेवारीनुसार, शनिवारी ४० हजार ८६३ लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत ३ कोटी ४४ लाख ५३ हजार ६०३ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 151 कोटींहून अधिक अँटी-करोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी ८९ लाख २८ हजार ३१६ डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत १५१ कोटी ५७ लाख ६० हजार ६४५ डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील ९१ टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर ६६ टक्के लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात, १५-१८ वयोगटातील २२ टक्के लोकांना अँटी-कोविड-१९ लसींचा पहिला डोस मिळाला आहे.