Paytm Share Price | पेटीएमच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांना कोटींचे नुकसान; सलग घसरण सुरूच

मुंबई : पेटीएमची पॅरेंट कंपनी वन 97 कम्युनिकेशन(One97 Communications)च्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी घसरण नोंदवली गेली आहे. शेअर्समध्ये घसरणीचा दबाव कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या पेटीएमचा शेअर आपल्या 52 आठवड्यांच्या सर्वात खालच्या स्तरावर ट्रेड करीत आहे. सोमवारी पेटीएमचा शेअर 72 अंकांच्या घसरणीसह 1159 रुपयांवर बंद झाला.

आयपीओच्या वेळी शेअरची इश्शु प्राइज 2150 रुपये इतकी होती. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना शेअर मिळाले होते. त्यांची गुंतवणूक आता निम्मी झाली आहे. शेअर आपल्याच इश्शू प्राइजला अद्याप स्पर्श करू शकलेला नाही. या स्टॉकचा उच्चांक 1961 रुपयांचा होता, जो लिस्टिंगच्या दिवशीच होता.

अनेक ब्रोकरेज फर्मने स्टॉकची रेटिंग कमी करून गुंतवणूक काढून घेण्याचा सल्ला दिला आहे. म्युच्युअल फंड देखील या स्टॉकमधून आपली गुंतवणूक कमी करीत आहेत. त्यामुळे या शेअरवर गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होत आहे. 

Comments : 0


    No Comments

Leave a comment