नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 71 हजार 202 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 7 हजार 743 वर पोहोचली आहे. देशात 15 लाख 50 हजार 377 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 1 लाख 38 हजार 331 जण कोरोनामुक्त झाले असून देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 16.28 वर गेला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 42 हजार 462 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 125 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1 लाख 38 हजार 331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे भारतात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 3 कोटी 50 लाख 85 हजार 721 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 2 लाख 72 हजार 202 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 314 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 4 लाख 86 हजार 66 वर पोहोचलाय.
देशातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 7 हजार 743 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात काल 125 ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालीय.