दिल्लीः सध्या देशात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) रूग्णांचा संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षी १५ मे नंतर देशात एका दिवसात 3 लाखापेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या सगळ्यात जास्त रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर रोजचा मृतांचा आकडाही ३५० पेक्षा अधिक आहे. कोरोनाचे (Corona) रुग्णसंख्या वाढत असतानाच ओमिक्रॉननेही डोके वर काढले आहे. यामुळे पुन्हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनाचे नियम काही ठिकाणी कडक केले जात आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांकडून नियमांना हरताळ फासला जात आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून वेगवेगळ्या राज्यातील प्रशासनाकडून कडक नियम पाळण्याच आवाहन केले जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केले की, देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आजर्यंत 158.96 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनाकडे 12. ७२ कोटी पेक्षा जास्त लस उपलब्ध आहेत.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या 3 लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज चोवीस तासामध्ये 3 लाख 17 हजार 532 रुग्णांची नोंद झाली असल्याचे जाहीर केले आहे. ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढून 9 हजार 285 जणांची नोंद झाली आहे.
केंद्रीय मंत्रालयाकडून आज स्पष्ट करण्यात आले की, बुधवारपर्यंत देशात 70 कोटी 93 लाख 56 हजार 830 कोविड लसीं नमुना चाचण्या करण्याच आल्या आहेत. यामधील 19 लाख 35 हजार 180 लसींची नमुना चाचणी बुधवारी करण्यात आली होती.
मुंबईमध्ये बुधवारी 12 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली आहे. आजपर्यंत 1 हजार 246 पोलिसांना कोरोनाची लागन झाली आहे. तर 10 हजार 648 पोलिसांना कोरोनाची लागन झाली होती. तर १२७ पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
गुजरातमध्ये कालपर्यंत 20 हजार 966 रुग्णांची नोंद झाली आहे. 2020 नंतर सगळ्यात जास्त रुग्णांची नोंद काल झाली आहे. यामध्ये 12 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात बुधवारपर्यंत 43 हजार 697 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कर्नाटकात 40 हजार 499 आणि केरळमध्ये 34 हजार 199 रुग्ण मिळाले आहेत. भारतात या आठवड्यात 350 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या या नव्या लाटेत देशात आज सगळ्यात जास्त म्हणजे 3 लाखापेक्षा जास्त रुग्ण मिळाले आहेत. बुधवारी 3 लाख 4 हजार 416 नवे रुग्ण मिळाले असून देशात आतापर्यंतचा आकडा 3.8 कोटीपर्यंत झाला आहे. तर सक्रिय रुग्णांचा 18.9 लाखाचा आकडा पार झाला आहे