देशभरात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. करोनाचा संसर्ग अतिशय झपाट्याने वाढताना दिसत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी वाढ होत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू देखील सुरूच आहेत. एकीकडे करोनाचा पुन्हा संकट ओढावलेलं असताना, दुसरीकडे करोनाचाच नवा व्हेरएंट असलेल्या ओमायक्रॉनचे देखील रूग्ण मोठ्यासंख्येने आढळून येत आहे.
देशभरात मागील २४ तासात ३ लाख ३७ हजार ७०४ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज आढळलेली करोनाबाधितांची संख्या ही कालच्या पेक्षा ९ हजार ५५० रूग्णांनी कमी आहे. तर, २ लाख ४२ हजार ६७६ जण करोनामधून बरे देखील झाले आहेत.
देशातील अॅक्टीव्ह केसेसची संख्या २१,३१,३६५ असून, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १७.२२ टक्के आहे. याशिवाय १० हजार ५० ओमायक्रॉनबाधितांची नोंद देखील झालेली आहे.