प्रजासत्ताक दिनानिमित्त मुरबाड मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुरबाड{ शंकर करडे}: भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा यांच्या विद्यमाने 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुरबाड शहरातील खुले नाट्य गृह येथे 26 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता आण्णा साळवे आयोजित कलाप्रेमी प्रस्तुत देशभक्तीपर गीते भीमगीते,कोळीगीते,लावणी ,महाराष्ट्रातील लोककलेचा खजिना कलारंग महाराष्ट्राचा मराठी वाद्यवृंद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मुरबाड, बदलापूर,शहापूर येथील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलंय त्या मुरबाड मधील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मुर्ती तेवत ठेवन्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या वारस दारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणारआहे.
या कार्यक्रमासाठी खास करून खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे उपस्थित राहणार आहेत. तरी मुरबाड करांनी या सुवर्ण संगीतमय मैफिलचा आनंद घ्या असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन अण्णा साळवे यांनी केला आहे