महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रवास मुभा कधी मिळणार ?
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलीय. सर्वसामान्यांचा हा लोकल प्रवास सुरु झाल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसत नाहीय. या पार्श्वभुमीवर प्रवास खुला करण्याचा पुढचा टप्पा लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रवास मुभा कधी देणार ? हा प्रश्न विचारला जातोय. यावर माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिलीय.
15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या मुंबई उपनगर आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी नाहीय. आता हळुहळू सर्व सुरळीत होत असताना लोकल प्रवास देखील पुर्ववत व्हावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केलीय.
तसेच महाविद्यालयाच्या वेळा गृहीत धरता ठराविक वेळेसाठी परवानगी न देता पूर्ण दिवस लोकल प्रवास खुला करवा असेही विद्यार्थ्यांनी म्हटलंय. दरम्यान, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार येईल असे उदय सामंत म्हणाले. यासंदर्भात उदय सामंत यांनी मुख्य सचिवांशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यासंदर्भातील निर्णय 5 मार्चनंतर घेणार असल्याचे सांगितले.
१ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सामान्यांसाठी ठराविक वेळांसाठी खुली झाली. सामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यावर कोरोनाचे रुग्ण मुंबईत वाढण्याचा अंदाज होता..पण मुंबईतली कोरोनासंख्या आटोक्यात आहे. पुढचे काही दिवसही मुंबईतला कोरोना असाच नियंत्रणात राहिला, तर पुढच्या १५ दिवसांत लोकलचं नवं टाईमटेबल जाहीर होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सध्या ठराविक वेळेमध्येच सामान्य मुंबईकरांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगी आहे... पण या ठराविक वेळा सामान्य मुंबईकरांसाठी अडचणीच्या ठरत आहे.सध्या तिकीटाच्या रांगांमध्ये मुंबईकरांचा बराच वेळ जातोय. त्यामुळे पुढच्या प्रवासातही अडचणी येत आहेत. सध्या मुंबईत रोज चारशे ते पाचशे रुग्ण सापडत आहेत. ही संख्या पुढचे काही दिवस नियंत्रणात राहिली, तर लोकलचं नवं टाईमटेबल येईल आणि सामान्य मुंबईकराला आणखी दिलासा नक्की मिळेल.