आता बदनामी थांबवा; संजय राठोडांनी हात जोडले , मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलीय !
वाशिम: पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आपला हात नसल्याचा अप्रत्यक्ष दावाच केला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. पोलीसही तपास करत आहेत. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल. पण समाजाची आणि माझी वैयक्तित बदनामी करू नका, असं ते म्हणाले. पत्रकार परिषदेत राठोड बराच वेळ हात जोडून बोलत होते. त्यांना तोंडाला मास्क लावले होते. पण तरीही त्यांच्यावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता.
मी मागासवर्गीय समाजातून आलो आहे. भटक्या विमुक्तांसाठी काम करत आहे. मी ओबीसींचा नेता आहे. पण गेल्या काही दिवसांपासून घाणेरडं राजकारण करून माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. विविध माध्यमांवर माझ्या बाबतीत जे काही दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. जे काही व्हायरल होत आहे. त्यात काही तथ्य नाही, असा दावाही त्यांनी
यावेळी त्यांनी आपण दहा दिवस गायब झालो नसल्याचाही दावा केला. मी दहा दिवस कुठेही गेलो नव्हते. जे काही सुरू होतं. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला सावरत होतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. माझी वृद्ध आई आहे. या सर्वांना मी सावरत होतो. मुंबईच्या माझ्या कार्यालयातून माझं काम सुरू होतं. मी आज काही बोलणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.