अमरावती : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आता त्यातच आणखी एका कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिस ( Mucormycosis) याचे निदान झाले आहे. याचेही रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे अमरावतीत म्युकरमायकोसिसच्या निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित करण्यात आले आहे. दर निश्चिंत करणार राज्यातील अमरावती पहिला जिल्हा असण्याची शक्यता आहे. (Mucormycosis Test Rate Fixed in Amaravti)
अमरावती जिल्ह्यात कोरोना बरोबरच म्युकरमायकोसिस ( Mucormycosis) रुग्णांनमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये या आजाराविषयी कमालीची भीती आहे. त्यामुळे अनेक लोक लक्षणे जाणवताच म्युकरमायकोसिस ( Mucormycosis) निदानासाठी त्याची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात जातात, तेथे रुग्णालयात रुग्णांकडून अधिक पैसे घेतल्या जाऊ नये यासाठी आता त्याचे दर अमरावतीत निश्चिंत करण्यात आले आहे. चाचणीच्या दरांचे फलक प्रथम भागात लावणे हे रुग्णालयाना बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.
म्युकरमायकोसिस ( Mucormycosis) निदानासाठी चाचण्याचे दर निश्चिंत करणार अमरावती हे राज्यातील पहिला जिल्हा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे जवळपास आतापर्यंत 100 पेक्षा जास्त रुग्ण हे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. ग्रामिण भागांतील जे लोक कोरोना मुक्त झाले अशा लोकांना म्युकरमायकोसिस या आजाराचे काही लक्षणे आहे का याची तपासणी करण्यासाठी मोहीम राबविली जाईल असेही जिल्हाधिकारी शैलेश यांनी सांगितले