परभणी | कोरोनाचं सावट हळूहळू कमी होत चाललं आहे. त्यामुळे कोरोना नियमांमध्येही शिथिलता करण्यात आली आहे. मात्र लोक या कोरोना नियमांचा फज्जा उडवताना दिसतायेत. सार्वजनिक ठिकणी जमावर करत आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. अशातच आता परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोमवारपासून सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.
कोरोना नियमांमध्ये होणारा निष्काळजीपणा पाहून कोरोना नियमाचं पालन न करणाऱ्याकडून 5 हजारांचा दंड आकारला जाईल, असं जिल्हा प्रशासनानं नमूद केलं आहे. त्यामुळे आता कोरोना नियमांमध्ये हलगर्जीपणा चांगलचं अंगलट येणार आहे.
दुकाने, कार्यालये, औद्योगिक सेवा, उपहारगृहे, बार व मॉल मालक व त्यांच्या आस्थापनांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण असणं बंधनकारक आहे. तसंच ग्राहकांनीही लसीकरण केलेले असावं. सोमवारपासून लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या गोष्टींचा समावेश आहे.
दरम्यान, मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, सॅनिटायझर वापरनं सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणं बंधनकारक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट रोखून आपण येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेला रोखू शकतो.