मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.
आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 767 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली असून 903 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 28 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 7 हजार 391 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण (Active Corona Patient) उपचार घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 36 हजार 425 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 84 हजार 338 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) होऊन घरी परतले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 41 हजार 025 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona Death) झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 56 लाख 19 हजार 951 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली आहे.