कोल्हापूर : पंजाबमधून स्पिरीट भरुन गोव्याकडे निघालेल्या ट्रकचालकाचा महाराष्ट्रातील फोंडा (Phona Ghat, Maharashtra) घाटात खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना चोवीस तासांच्या आतच दिल्लीतून अटक केली आहे. फोंडा घाटात नियोजनबद्धरीत्या ट्रक चालकाचा खून (Punjab Truck Driver Murder Case) करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. शनिवारी ट्रकच्या केबीनमध्ये पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी पोस्टमॉर्टेम केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं उघड झालं होतं. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तरलोकसिंग धरमसिंग असल्याचं समोर आलं होतं. वय वर्ष 54 असलेल्या तरलोकसिंह हे पंजाबमधून गोव्याच्या (Goa) दिशेनं ट्रक घेऊन चालले होते. पण वाटेतच त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी हत्या झाल्याचं कळताच विशेष पथक नेमून 24 तासांच्या आत दोघांना बेड्या ठोकल्यात.
ट्रक चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. यातील संशयित आरोपी कमलजीत हा पाच वर्षांपासून मृत धरमसिंहच्या ओळखीचा होता. अधनंमधनं तो त्याच्यासोबत प्रवास करत असे. दरम्यान, दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाला होता. धरमसिंग यांच्याकडे असलेल्यी वीस हजार रुपये रोख रक्कम लुटण्याच्या हेतूनं त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. तर लोखंडी रॉडनं हत्या केल्यानंतर त्यांच्याकडील 20 हजार रुपयांची रोकड घेऊन दोघांनी पलायन केलं होतं.
पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावंही समोर आली आहेत. यापैकी कमलिजत सिंग हा 53 वर्षांचा असून बलविंदर हा 25 वर्षांचा आहे. या दोघांनी क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. ट्रक आला कुठून? त्याचा मार्ग काय होता? तसंच ट्रकमधील कागदपत्रांच्या आधारं पोलिसांनी आरोपींची शोध घेण्यास सुरुवात केली. तसंच सीसीटीव्ही फुटेचच्या मदतीनं पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरु केली होती. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पोलिसांनी या हत्येप्रकरणी चोवीस तासांच्या आत आरोपींना गजाआड केलंय.
आरोपील रेल्वेनं दिल्लीली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी विमानानं दिल्ली गाठली आणि रेल्वे स्टेशनवरच दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. सापळा रचून पोलिसांनी महाराष्ट्रात पंजाबमधील ट्रक चालकाची हत्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.