मुंबई २६ जानेवारी - भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात खासदार सुप्रियाताई सुळे तर प्रदेश कार्यालयात युवा नेते रोहित पाटील यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी राज्य घटना मिळाली त्या राज्यघटनेतील तरतुदीचे पालन करणे त्यासाठी आग्रही राहणे आणि वेळप्रसंगी लढाई करणे यातून आपले हे प्रजासत्ताक राज्य बलवान बनवणे हा आपल्यासमोर कार्यक्रम असायला हवा असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे व युवा नेते रोहित पाटील यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे, युवा नेते रोहित पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.