सावंतवाडी : बांदा शहर व परिसरातील रुग्णांना उपचारासाठी मुंबई येथे आर्थिक मदतीची गरज भासल्यास आपण तात्काळ मदत देऊ, यासाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव देताना श्री बांदेश्वर-भूमिका देवस्थान समितीने आपले शिफारस पत्र द्यावे. बांदा हे माझे गाव असल्याने या गावाच्या भौतिक, आरोग्य विषयक सुविधांसाठी आपण तत्पर आहोत असे आश्वासन शिवसेना नेते, अभिनेते तथा श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी येथे दिले.
त्यांनी सहकुटुंब श्री बांदेश्वर-भूमिका व गजांतलक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे देवस्थान समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले. श्री बांदेकर यांनी यावेळी मंदिरात बैठक घेत विविध विषयांवर चर्चा केली. आदेश बांदेकर यांचे श्री गजांतलक्ष्मी हे कुलदैवत आहे. या मंदिरात हे दरवर्षी सहकुटुंब भेट देतात. बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांनी मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांचे देवस्थान समिती अध्यक्ष सुभाष मोर्ये, सरपंच अRम खान यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, राजा सावंत, गोविंद सावंत, उमेश सावंत, ऋषिकेश देसाई आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी बांदा शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. भविष्यात शहरासाठी योगदान देण्याची ग्वाही दिली. तसेच ग्रामीण भागातील प्रयोगशील शेतकरम्य़ांची यादी बनवावी, त्यांच्यासाठी विविध योजना देण्याचे आश्वासन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्ण हे उपचारासाठी मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल असतात, मात्र त्यांना आर्थिक समस्येमुळे उपचार घेणे अडचणीचे ठरते. यासाठी अशा रुग्णांना मदत देण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून आपण निष्टिद्धr(१५५)तच प्रयशील आहोत. यासाठी प्रस्ताव देताना देवस्थान समितीचे पत्र सोबत जोडावे असे त्यांनी सांगितले.
कुलदेवतेचे भव्य मंदिर उभारणार
येथील गजांतलक्ष्मीचे मंदिर हे बांदेकर कुटुंबियांचे कुलदैवत आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारण्यासाठी देवस्थान समितीने आराखडा तयार करावा, यासाठी सर्वतोपरी मदत आपण करण्याचे आदेश बांदेकर यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर व कुटुंबीय उपस्थित होते.