देशात करोना संसर्गाचे प्रमाण आता काहीसे कमी-कमी होत असले, तरी देखील करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत दररोज वाढ सुरूच असल्याचे दिसत आहे. देशात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही आता २ लाखांच्या खाली आली आहे मात्र रूग्णांची मृत्यू संख्या ही एक हजारांच्या वर आहे.
मागील २४ तासांत देशभरात १लाख ६१ हजार ३८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १ हजार ७३३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे देशात आजपर्यंत मृत्यू झालेल्या करोनाबाधितांची एकूण संख्या ४,९७,९७५ झाली आहे.
याशिवाय देशात मागील २४ तासांमध्ये २ लाख ८१ हजार १०९ रूग्ण कोरनातून बरे देखील झाले आहेत. सध्या देशातील अॅक्टीव्ह केसेसची संख्या १६,२१,६०३ आहे. तर आजपर्यंत ३,९५,११,३०७ जण करोनातून बरे झाले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ९.२६ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती मिळाली आहे.