महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा कऱण्यात आल्याने सध्या चर्चांना उधाण आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट केला जायचा हे तर आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण आता राज ठाकरेंचाही उल्लेख तशा पद्धतीने करण्यात आल्याने चर्चा रंगली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी याआधी आपला उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा केला जाऊ नये असं कार्यकर्त्यांना खडसावलं होतं. पण या पोस्टर्समुळे पुन्हा एकदा मनसैनिकांना कठोर आदेश देण्यात आले आहेत.
घाटकोपरमध्ये राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त राज ठाकरेंचे मोठे बॅनर्स परिसरात SSलावण्यात आले होते. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे मोठे बॅनर्स लावले होते. त्यावरून आपल्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट हा उल्लेख करून नका, अशा शब्दांत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावले आहे. ‘हिंदूहृदय सम्राट’ ही पदवी जनतेने उत्स्फूर्तपणे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांमुळे त्यांना जनतेने बहाल केली आहे. केवळ बाळासाहेब ठाकरे यांनाच हिंदूहृदय सम्राट म्हणून ओळखलं जाईल असं शिवसैनिकांचं म्हणणं होतं. त्यानंतर अखेर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबत मनसैनिकांना आदेश जारी करण्यात आले आहेत .
“महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या उपाधी व्यतिरिक्त (म्हणजे ‘मराठी हृदयसम्राट’ व्यतिरिक्त) इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. तसेच या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावं”, असं आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी याआधी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली होती. २७ जानेवारी २०२० ला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यात राज ठाकरेंचा हिंदूहृदय सम्राट असा उल्लेख करणारे बॅनर्स लावण्यात आले होतं.