धुळे: येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. कर्मवीर डॉ. पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दत्ता ढाले व माजी प्राचार्य डॉ. डी. ए. पाटील लिखित महाराष्ट्रातील औषधी वनस्पती संग्रह या पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे व्यवस्थापकीय सदस्य डॉ. मोहन पावरा, अधिसभा सदस्य श्री नितीन ठाकूर, रासेयो राज्य सल्लागार समिती सदस्य श्री संजय शिसोदे, प्राचार्य व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. संजय सोनवणे, जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एच. पवार, कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर टी. पाटील तसेच विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर व्ही. पाटील यांची विशेष उपस्थिती होती. सदर कार्यक्रमास धुळे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक व रासेयो कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. प्रस्तुत पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील 384 औषधी वनस्पतींची माहिती देण्यात आलेली असून वनस्पतीचे शास्त्रीय किंवा लॅटिन नाव, कुळ, शास्त्रीय वर्णन, उपयुक्त भाग, उपयोगिता, रसायने, भौगोलिक प्रसार इत्यादी बाबीवर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेतील त्यांची नावे इतर भाषकांना उमज होण्याच्या दृष्टीने दिली आहेत. औषधी रसायनांचा उल्लेख इंग्रजीत शास्त्रीय भाषेतच संभ्रम टाळण्याच्या हेतूने दिला आहे. पुस्तकाच्या परिशिष्ट मध्ये विविध रोग आणि त्यावरील औषधे, तसेच औषधी गुणांनुसार औषधी वनस्पती ची सूची दिली आहे. शास्त्रीय व इतर भाषेतील नावे वर्णमाला नुसार दिली आहेत. सर्व 384 वनस्पतींचे रंगीत छायाचित्र आणि उपयुक्त भाग हा समजण्यासाठी सोयिस्कर म्हणून पुस्तकामध्ये समविस्ट करण्यात आलेला आहे. सामान्य जनास सदरील ग्रंथ उपयुक्त ठरावा हा जरी या ग्रंथाचा प्रमुख हेतू असला तरी व्यवसायिक विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांनाही त्याचा उपयोग होईलच. पारंपारिक शिक्षणाबरोबर आयुर्वेदिक, शिक्षण, कृषी, उद्योग व वन विभाग यांनाही हा ग्रंथ संग्रही ठेवावा असा आहे. हे पुस्तक राष्ट्रीय दर्जाच्या प्रशांत पब्लिकेशन यांचेकडून प्रकाशित झाले असल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील मराठी भाषिकांसाठी अतिशय उपयुक्त असे पुस्तक ठरणार आहे. याबद्दल लेखकांचे अभिनंदन संस्थेचे सर्वेसर्वा माजी मंत्री रोहिदास पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाईदासजी पाटील,संस्थेचे चेअरमन आमदार मा. बाबासाहेब कुणालची पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. भैय्यासाहेब एस.टी. पाटील, मा. प्रफुल्लजी शिसोदे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा. प्रमोदजी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर व्ही. पाटील उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे, विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. संध्या पाटील, सर्व प्राध्यापक वृंद व महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सोबत फोटो: प्रा. डॉ. दत्ता ढाले व माजी प्राचार्य डी. ए. पाटील लिखित महाराष्ट्रातील औषधी वनस्पती संग्रह या पुस्तकाचे प्रकाशन करताना कवयत्री बहिणाबाई चौधरी उ. म. विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक माननीय डॉ. सचिन नांद्रे सोबत प्राचार्य डॉ. संजय सोनवणे, प्राचार्य डॉ. मनोहर टी. पाटील, प्राचार्य मनोहर व्ही. पाटील, माजी प्राचार्य डॉ. डी. ए. पाटील व प्रा. डॉ. दत्ता ढाले आदी.
प्रतिनिधी : चेतन सोनवणे मुकटी