पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) संकष्टी चतुर्थीनिमित्त (Sankashti Chaturthi) आज (दि. 21 मार्च) गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव (Grape festival) साजरा करण्यात येत आहे. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी मंदिरात केली जात आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात ही आकर्षक आरास करण्यात आली आहे. सकाळी ही आरास पूर्ण झाली असून भाविकांना पाहण्यासाठी खुली झाली आहे. भाविकांनीही मंदिरात गर्दी केली आहे. दिवसभर भाविकांची मांदियाळी मंदिरात असणार आहे.
सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता हा योग जुळून येत आहे. ही द्राक्षे न धुता ही खाता येणारी असून पूर्णत नैसर्गिक, रसायनविरहित आहेत. ती नंतर ससून रुग्णालयातील रुग्णांना, गरजूंना तसेच भाविकांना वाटली जाणार आहेत.
आज संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनीही गर्दी केली आहे. इथली हिरवळ पाहून मन प्रसन्न झाल्याचे भाविकांनी सांगितले. मंदिर परिसरातले वातावरण अत्यंत प्रसन्न झाले असून तिथून जावेसे वाटत नाही, अशा प्रतिक्रिया भाविकांनी दिल्या आहेत.