उन्मेष गुजराथी
हजारो जणांना बोगस पीएचडी विकणारा भामटा राज्यपालांबरोबर ब्रेकफास्टला उन्मेष गुजराथी राजभवनात आर्थिक गैरव्यवहार करून मोठमोठाले पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात, त्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्ताही नसतो. कोणताही शहानिशा न करता समाजकंटक, फ्रॉड, गुंड लोकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो, अशी बातमी फोटो व पुराव्यासह 'स्प्राऊट्स'मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर राजभवनात बोगस पीएचडी वाटपाचे कार्यक्रम साजरे केले जातात, त्याची छायाचित्रेही सर्वप्रथम स्प्राऊट्समधून प्रसिद्ध करण्यात आली. याहूनही गंभीर प्रकरण म्हणजे महाराष्ट्रासह देशभरात अगदी अशिक्षित लोकांनाही बोगस पीएचडी विकण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला मधू कृष्णन याने २६ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत येवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कृष्णन हा THE AMERICAN UNIVERSITY, USA या व इतरही अनेक फेक युनिव्हर्सिटीचा सर्वेसर्वा आहे. त्याने राज्यपालांबरोबर येवून सकाळी ९.३० वाजता त्यांच्याबरोबर ब्रेकफास्ट केला .राज्यपालांनीही बेजबाबदारपणे त्याचा व त्याच्याबरोबर असणाऱ्या Ranbir Singh Laishram या व इतर बोगस टोळीतील सर्वांचाच सत्कार केला. त्यांच्याबरोबर चर्चा केली, हे गंभीर प्रकरण आहे. याप्रकरणी राजभवनातील सचिन वाझे व बेकायदेशीरपणे बसलेले राज्यपालांचे सचिव उल्हास मुणगेकर व त्याच्या कंपूतील अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही अधिवक्ता दिलीप इनकर यांनी केली आहे. राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात. त्यांच्या हातून बोगस पीएचडी विकणाऱ्यांचा सत्कार होतो. ते फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले जातात. त्यामुळे सामान्य जनतेची दिशाभूल होते. त्याचा फायदा घेवून मधू कृष्णन व त्यांचे दलाल मोठी रक्कम घेवून बोगस पीएचडी विकतात, दुर्दैवाची बाब म्हणजे हे सर्व स्प्राऊट्समध्ये प्रकाशित होवूनही हे सर्व दोषी इसम उजळ माथ्याने फिरत आहेत. दरवर्षी नव्या संस्था व नव्या बोगस विद्यापीठांची स्थापना करून जनतेला गंडवत असतात. श्री. श्री. रविशंकर, कुमार सानू, विवेक बिंद्रा, स्नेह देसाई, अनु मलिक, आदित्य नारायणन, मंदिरा बेदी यांसारखे हजारो कथित सेलेब्रिटी बोगस पीएचडी घेवून समाजाची दिशाभूल करीत असतात. याना पीएचडी देणाऱ्या दलालांनी आता नवी शक्कल लढविली आहे. ते मूळ फेक युनिव्हर्सिटीला फक्त ५ ते ६ जणांची नावे देतात व इतरांना चक्क स्वतः:च प्रिंट काढून ही बोगस पीएचडीची सर्टिफिकेट्स बनावट सह्यांनीशी वाटतात, त्यामुळे त्यांना मूळ फेक यूनिव्हर्सिटीला भलेमोठे कमिशन देण्याचाही प्रश्न उरत नाही. वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करीत आहोत.
• ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,
• अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,
• कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,
• युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी
• अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए, • झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी, • सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स, • महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन - (NGO)
• एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट - (NGO)
• नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी - NGO
• डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस - NGO
• मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश
• मानव भारती विद्यापीठ, सोलन
• विनायक मिशन्स किंवा सिंघानिया.
• अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस
• छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
• अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)
• पीस युनिव्हर्सिटी • सेंट मदर टेरेससा युनिव्हर्सिटी