प्रतिनिधी, १७ मे २०२२ :- कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांवर कमालीचा ताणतणाव असतो. तो घालवण्यासाठी कधीमधी एखादी किरकोळ रजा घेता यावी. यासाठी किरकोळ रजेचे (सीएल) दिवस वाढवण्याचा पोलिस महासंचालकांनी बनवलेला होता. तो प्रस्ताव मंत्रालयात धुळ खात पडून आहे. विधीमंडळात गृहराज्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे. अद्याप यावर काहीही निर्णय झाला नसल्याचे महाराष्ट्र पोलिस दलातील कित्येकांचे म्हणणे आहे. पोलीस विभागातील पोलीस दलाला १२ तास कर्तव्य पार पाडावे लागते. वर्षभर सण, उत्सव, जयंत्या, मेळावे, राजकीय पक्षांची आंदोलनं, सभा आदींसाठी बंदोबस्ताला सज्ज राहावे लागते. तसेच पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा आदी ठिकाणी १२ तासांपेक्षाही जास्त कालावधी संपून जाती. तरीही पोलिसांचे काम उरकत नाही. याला पोलीस अधिकारी वर्ग अपवाद नाही. किरकोळ रजेचे दिवस वाढवले तर थोडेफार मानसिक आणि शारीरिक अराम वेळोवेळी मिळेल. याचा विचार करून तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलिसांच्या किरकोळ रजेत वाढ करणारा प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवला. पोलिसांना सध्या किरकोळ रजेचे १२ दिवस मिळतात. यात ८ दिवसांची वाढ करून २० दिवसांच्या किरकोळ रजेचा प्रस्ताव पांडे यांनी तयार केला होता. तो प्रस्ताव गृहखात्याकडे मंजुरीसाठी मंत्रालयात पडून आहे. यावर कोणताही निर्णय झाला नाही. पोलिसांना २० दिवसांची किरकोळ रजा मिळावी, अशी भावना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवली. तातडीने प्रस्ताव मेनी करून तास आदेश निघेल अशी घोषणा देसाई यांनी मागील अधिवेशनात विधिमंडळात केली, मात्र अद्यापही या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही.