महाराष्ट्र सरकार मोफत रोप वाटप योजना:कोट्यवधी रुपये लाटणारा आरोपी अद्यापही मोकाटच
तक्रार देवूनही कारवाई नाही...
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील परतूर व घनसावंगी तालुक्यात मोठा भ्रष्टाचार झाला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत हा महाघोटाळा झाला, याचा सर्वप्रथम भांडाफोड 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने केला. त्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अक्षरश: धाबे दणाणले.
या महाघोटाळ्यात अनेक बडे सरकारी अधिकारी सामील आहेत. यांना हाताशी धरून तालुका कृषी अधिकारी राम रोकडे, कृषी सहायक अधिकारी अमोल कोल्हे आणि बिले काढणारा अधिकारी दिलीप हिवाळे हे अद्यापही मोकाट फिरत आहेत. यासंबंधी डॉ. विजय राठोड यांच्याकडे तक्रारीही केल्या आहेत, मात्र त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे राठोड हेही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे आढळून येते.
या महाघोटाळ्यामधील आरोपींची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. इतकेच नव्हे तर राम रोकडे यांचीही अंमलबजावणी संचनालय, आयकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गावडे यांनी केली आहे.
असा झाला घोटाळा:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार या योजनेतील काही सरकारी अधिकाऱ्यांनी नर्सरीतून जवळपास ५० कोटी रुपयांहून अधिक रकमेची रोपे खरेदी केली, असे कागदोपत्री दाखवले. त्यासाठी त्यांनी चक्क खोटी बिले छापून ती सरकारला सादर केली. या बिलांचे पैसेही लाटले. इतकेच नव्हे तर त्यांनी ही काल्पनिक रोपे या योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांना मोफत, वाटली असल्याचे कागदोपत्री दाखवले.
Unmesh Gujarathi उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी