वाकडी ग्रामपंचायत,जि. जळगाव येथे गावालगत असलेल्या केटीवेअर मागील वर्षी दि. ३०/०८/२०२१रोजी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीसददृश्य महापूर आल्याने पुराच्या पाण्यामुळे अडकलेले बाभूळ,लिंबासारखे अनेक झाडे अडकून पडलेली आहेत. त्यामुळे गावात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. ते केटीवेअर पूर्णपणे बंद झालेले आहेत.त्यामुळे गावामध्ये पुराचे पाणी घुसून जिवीतहानी व वित्तहानी होण्याची दाट शकत्या आहे.त्यामुळे नादुरुस्त असलेला केटीवेअर व त्यामध्ये अडकलेली झाडे तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावे,अन्यथा वेळेच्या आत दुरुस्त न झाल्यास पुढील होणाऱ्या जिवित व वित्तहानीस संपुर्णत: जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासन जबाबदार राहील. अशा प्रकारचे निवदेन जिल्हा अधिकारी याना ग्रामपंचायत वाकडी यांच्याकडून देण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब, यांना वाकडी येथील केटीवेअर मध्ये झाडे अडकुन तो पुर्णपणे बंद झाला आहे. तो पुर्णपणे साफ करून द्यावा यासंबंधी निवेदन देताना नासो. प्रकाश पाटील सरपंच वाकडी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद 15 वित्त आयोग नियोजन समिती सदस्य जळगाव. अशोक ( दादा ) कोळी, सुदाम ( दादा ) कोळी, दादाभाऊ कोळी. सर्व उपस्थित होते.