मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बसचा अपघात झाला आहे. या झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या घरच्यांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. १३ मृतांपैकी ८ जणांची ओळख पटली आहे यातले ५ जण हे महाराष्ट्रातले असल्याची माहिते समोर येत आहे. तसेच काही प्रवास बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. मध्य प्रदेशात असलेल्या नर्मदा नदीमध्ये आज सकाळी झालेल्या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02572223180 आणि 02572217193 असा आहे.
अपघातात झालेल्या मृतांची नावे...
१. चेतन राम गोपाल जांगिड़ रा. नांगल कला, गोविंदगढ़, जयपुर राजस्थान २. जगन्नाथ हेमराज जोशी (७०) रा. मल्हारगढ़, उदयपुर राजस्थान ३. प्रकाश श्रवण चौधरी (४०) रा. शारदा कॉलनी, अमळनेर ४. निंबाजी आनंदा पाटील (६०) रा. पिलोदा अमळनेर ५. कमला निंबाजी पाटील (५५) रा. पिलोदा अमळनेर ६. चंद्रकांत एकनाथ पाटील (४५) रा. अमळनेर ७. अरवा मुर्तजा बोरा (३७) रा. मूर्तिजापुर, अकोला. ८. सैफुद्दीन अब्बास रा. नूरानी नगर, इंदूर