दिल्ली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय महाअधिवेशन आज दिल्ली येथे भरले आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांची प्रमुख उपस्थित होते. या अधिवेशनाबाबत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'ओबीसी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. राज्यात सत्तेत असताना आमचाही प्रयत्न हाच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी आहेत. सर्वात जास्त OBC मंत्री बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे यापुढेही ओबीसींना अडचणी येणार नाहीतं.'
दरम्यान, आज या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकाच मंचावर होते. यावेळी फडणवीसांनी भाषण केलं ते म्हणाले, 'बबनराव तायवाडे यांचे आभार मानतो, त्यांनी ओबीसींना एकत्र आणून ताकद निर्माण केली. ज्या २२ मागण्या यावेळी ठेवल्या आहेत, माझ्या क्षमतेनुसार या मागण्या मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील.
माझ्या सरकारच्या काळात मी ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय ची मागणी पूर्ण केली. २१ मागण्या मी ओबीसींच्या पूर्ण केल्या आहेत. आताही शिंदे सरकार ओबीसींचे अधिकार आणि मागण्या मान्य करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, 'मी म्हटलं होतं की आमचं सरकार आलं तर चार महिन्यात मी ओबीसींचे राजकीय आरक्षण आणू अन्यथा राजकीय संन्यास घेऊ आणि आम्ही सरकार आल्यावर ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळविलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्या, केंद्रीय मंत्रिमंडळात २२ ओबीसी मंत्री आहे. राजकीय विषय सोडून सर्व मिळून आम्ही ओबीसींचे प्रश्न मार्गी लावू. मी ३० वर्षांपासून राजकारणात आहे. मी ओबीसींमुळेच निवडून येतो, त्यामुळं ओबीसी साठी जे जे करता येईल ते ते सर्व करू असंही फडणवीस यावेळी म्हणाले.