मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्यात आगामी काळात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा रवींद्र नाट्य मंदिरात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्ष संघटना, आगामी निवडणुका याबाबत आजच्या या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती दिली. राज्यात हिंदुत्वाची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वी राज ठाकरे यांनी घेतली होती. मशिदीवरील भोंगे बंद केले नाहीत तर त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावा, असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर राज्यात बराच राजकीय वादजंग झालाय राज ठाकरे हिंदुत्वाचा आक्रमक मुद्दा उपस्थित करीत असल्याचे दिसले. राज ठाकरे आणि भाजपा यांची जवळीकही सगळ्यांना पाहयला मिळते आहे.नांदगावकर यांनी उद्या राज ठाकरे राज्यातील पदाधिकाऱ्यांना संबोधित करुन पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची दिली आहे. त्याना अशी अपेक्षा आहे की , ठाकरे पत्रकार परिषदे घेणार आहेत, यात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.