लोकशाहीसाठी प्रत्यक्ष जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा अत्यंत घातकी आहे.गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही. आणि स्थानिक पातळीवर मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते.एका विचाराचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आलेला तर उर्वरीत बहुसंख्य सदस्य दुसऱ्या विचाराचे असल्यास शहरांच्या विकासाला खीळ बसते, असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेच्या सभागृहात जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. तसेच जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा आग्रह धरत असाल तर मुख्यमंत्रीसुध्दा थेट जनतेतूनच निवडून द्या, असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी सरकारला लगावला आहे .