मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज ही घोषणा केली आहे की ,दहीहंडीत मृत्युमुखी पडलेल्या गोविंदांना राज्य सरकारने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून ही मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.राज्यात दहिहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहिहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना १० लाखांचं विमा संरक्षण देणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं सुरुवातीला केली होती. मात्र,हा निर्णय नंतर काही तांत्रिक अडचणीमुळं बदलण्यात आला,एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत करण्याच निर्णय घेतला . मुंबईतील एका गोविंदाचा सोमवारी मृत्यू झाला आहे. संदेश दळवी, असं मृत्यू झालेल्या गोविंदाचं नावं आहे . रविवारी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संदेशच्या डोक्याला इजा झाली होती. त्याच्या डोक्यावर शस्रक्रियाही करण्यात आली होती. पण गंभीर दुखापत झाल्यानं संदेश दळवीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर यांनी संदेश दळवीच्या कुटुंबाला मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं