BCCI ने सोमवारी ICC T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा केली. पुढील महिन्यात ही स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धेची सुरुवात 16 ऑक्टोबर रोजी क्वालिफायर सामन्यांनी होईल. T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत एकूण 45 सामने खेळवले जातील.
टी-20 स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी टी-20 संघांचीही घोषणा केली आहे.
विश्वचषकात भारताचा सामना २३ ऑक्टोबरमध्ये होणार आहे.
टी-२० विश्वचषकासाठी संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (WK), दिनेश कार्तिक (WK), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.