पालघर : करोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाने आपल्या बहुतांश सेवा पूर्ववत सुरू केल्या आहेत. अनेक बससेवा उपलब्ध झाल्याने जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीचे ठरणार आहे.
टाळेबंदीच्या कालावधीत राज्य परिवहनच्या पालघर विभागात सरासरी ९० ते ९५ नियते (शेड्युल) व वाहने कार्यरत होती. २१मे रोजी सरासरी ७०मार्गांवर सरासरी २२ ते २३ हजार किलोमीटरपर्यंत बसगाड्या धावत होत्या. ७ जूनपासून दैनंदिन १५५ नियते (गाड्या) व ३८ हजार किलोमीटरपर्यंत बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. साधारणपणे १५० ते १६० मार्गावरील फेऱ्यांसह पालघर विभागातील विविध आगारांमधून आंतरजिल्हा लांब पल्ल्याच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
पालघर विभागातील सुरू झालेले मार्ग
पालघर – नंदुरबार (८.१५), पालघर – धुळे (८.००), पालघर – अहमदनगर (७.४५), पालघर – मुरबाड (१५.४५), सफाळे – धुळे (७.४५), बोईसर – भुसावळ (१८.००), बोईसर – अहमदनगर (८.१५)
अर्नाळा – भिवंडी – धुळे (६.१५), अर्नाळा – ठाणे – नाशिक (६.४५), अर्नाळा – अहमदनगर (६.२०), अर्नाळा – ठाणे (दर तासाला), नालासोपारा – अहमदनगर (७.००), नालासोपारा – अमळनेर (७.१५), नालासोपारा – ठाणे (दर तासाला), वसई – नंदुरबार (६.००), वसई – जळगाव (७.००), वसई – अहमदनगर (७.१५), वसई – ठाणे (दर तासाला)
डहाणू – धुळे (६.१५), डहाणू – ठाणे (८.००), जव्हार – धुळे (७.००), जव्हार – नाशिक रोड (१३.३०)