कासा : जव्हार तालुक्यातील खडखड गावातील शिधावाटप दुकानदाराकडून धान्याचा काळाबाजार करण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला दुकानातील धान्य विक्रीसाठी इतर ठिकाणी टेम्पोतून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी तो अडविला. मात्र टेम्पोचालकाने टेम्पो तिथेच ठेवून पळ काढला. जव्हारचे तहसीलदार आणि प्रांत यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून त्या स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात कडक कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जव्हारचे तहसीलदार, पुरवठा अधिकारी, संबंधित तलाठी यांच्याकडून सदर दुकानदारांची तपासणी करून त्यांच्या अहवालावरून दुकाननदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जव्हारचे प्रांत अधिकारी आयुषी सिंग सांगितले आहे.