उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये आधार कार्ड बनवणारी टोळी पकडण्यात आली आहे. इथे बनावट पद्धतीने आधार कार्ड बनवले जात होते, या टोळीने आतापर्यंत ३० हजारांहून अधिक आधारकार्ड बनवले आहेत. गाझियाबाद सायबर सेल आणि सर्व्हिस लाइन टीमने संयुक्त कारवाई करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी छुप्या पद्धतीने बनावट आधार कार्ड बनवत होती आणि कोणाला याची माहितीही नव्हती, असं सांगण्यात आलं आहे. त्यांच्याकडून अनेक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या या टोळीतील आठ जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून २०९ रबर थंब प्रिंट्स, १३७ बनावट आधारकार्ड, आय स्कॅनर, ६१ कागद ज्यावर रेटिना प्रिंट आहे, ३० लॅपटॉप, ९ मोबाईल, ५ आय स्कॅनर, ३ थंब स्कॅनर, प्रिंटर व इतर वस्तू सापडल्या आहेत. त्याचवेळी, चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, अंकित गुप्ता नावाचा व्यक्ती या केंद्राचा संचालक आहे. चौकशीदरम्यान असं समजलं की, अंकितने आसाममधील असुझा कंपनीशी संपर्क साधून आधार कार्ड बनवण्यासाठी बनवलेला ओळखपत्र मिळवला होता.
आधार कार्ड बनवण्यासाठी ५ हजार रुपयेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची बनावट आधारकार्ड बनवत असत. ही टोळी आधार कार्ड बनवण्यासाठी ५ हजार रुपये घेत असे. एवढेच नाही तर नाव आणि पत्ता बदलण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये घेत असे. या टोळीने आतापर्यंत किमान ३० हजार बनावट आधार कार्ड बनवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
बनावट आणि खरा आधार असा ओळखायचाबनावट आणि खरे आधार कार्ड तपासण्यासाठी सरकारकडून मोहीम राबवली जात आहे. अलीकडेच UIDAI ने बाजारात तयार केलेल्या PVC आधारवर बंदी घातली आहे. आणि याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, UIDAI संस्थेने जारी केलेले PVC कार्डच वैध असतील. याशिवाय लोकांना बनावट आधार कार्ड बनवण्याबाबत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुम्हालाही तुमचे आधार कार्ड तपासायचे असेल तर तुम्ही ते अशा प्रकारे तपासू शकता.