रियलमीने काही दिवसांपूर्वी आपल्या पॉवरफू जीटी सीरिजमध्ये Realme GT Neo 2 स्मार्टफोन सादर केला आहे. चीनमध्ये सादर झालेला हा फोन या आठवड्यात भारतीय बाजारात देखील दाखल होणार आहे. त्याचबरोबर आता अजून एका नवीन Realme फोनची माहिती समोर आली आहे. कंपनी आपल्या 'नियो जीटी 2' लाईनअपमध्ये Realme GT Neo 2T नावाचा नवीन फोन जोडणार आहे.
Realme GT Neo 2T Launch
Realme GT Neo 2T येत्या 19 ऑक्टोबरला लाँच केला जाणार आहे. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल. त्यानंतर हा फोन भारतसह जगभरात सादर केला जाईल. कंपनी या फोनच्या लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण करणार आहे, जे कंपनीच्या वेबसाईटवरून बघता येईल.
स्पेसिफिकेशन्स
लिक्स आणि रिपोर्ट्समधून रियलमी जीटी नियो 2टी चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार कंपनी हा फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह सादर करू शकते. हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह बाजारत दाखल होईल. ज्यात मीडियाटेक डिमेनसिटी 1200 चिपसेट दिला जाऊ शकतो. सोबत 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी या डिवाइसच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर व 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर असेल. या फोनमधील सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. आगामी Realme GT Neo 2T मधील 4,500एमएएच बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.