कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठवपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून याठिकाणी नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणासाठी लांब जावे लागणार नाही. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याठिकाणी जाऊन लसीकरण करून घ्यावे ही विनंती.
यावेळी उद्योगपती विजय भाने, माजी नगरसेवक गणेश भाने, माजी सरपंच बळीराम भाने, समाजसेवक अनिल पाटील, माजी उपसरपंच वासुदेव गायकर, केशव भाने, पंढरीनाथ पाटील आदि मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
नागरिकांच्या लसीकरणासाठी मेहनत घेण्याऱ्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.