ठाणे : कळवा येथील पारसिक डोंगरावर वसलेल्या इंदिरानगर भागात शनिवारी रात्री सहा घरांवर दरड कोसळली. त्यापूर्वी रहिवासी घराबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. परिसरातील २० कुटुंबांना ठाणे महापालिकेच्या शाळेमध्ये हलविण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच घोलाईनगर येथे अशाचप्रकारे दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता.
इंदिरानगर परिसरात माँ काली चाळ आहे. या चाळीतील घरांवर शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास माती आणि दगड पडण्यास सुरवात झाली. रहिवाशांनी तात्काळ घरे रिकामी करून पळ काढला. त्यानंतर सहा घरांवर दरड येथील कोसळली. रहिवाशांनी घरे सोडल्याने मोठी दुर्घटना टळली. येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या शाळेत हलविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच याच भागातील घोलाईनगर येथे एका घरावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता.