मुंबई : पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या दहा वर्षांच्या मुलीला व्हॉट्सअॅपवर अश्लील चित्रफीती पाठवून तिलाही तिच्या नग्नावस्थेतील चित्रफीती पाठविण्यासाठी धमकाविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडीतून अटक केली आहे.
अजय म्हात्रे (३०) आणि सनी जनीयानी अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी कुटुंबियांनी मोबाईल दिला होता. स्नॅप चॅट या अॅपद्वारे आरोपींनी या मुलीचा संपर्क क्रमांक मिळविला होता. मुलगी ऑनलाईन शिक्षण करत असताना एके दिवशी तिला सनीने स्वतङ्मची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफीती पाठविल्या. त्यानंतर सनीने तिचा मोबाईल क्रमांक अजयला दिला. त्यानेही या मुलीला त्याच्या अश्लील चित्रफीती पाठविल्या. तसेच त्यांनी तिलाही तिच्या अश्लील चित्रफीती पाठविण्यास सांगितले. मात्र मुलीने याला नकार देताच त्यांनी तिच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अजय आणि सनीच्या धमक्यांच्या भीतीने तिने तिच्या अश्लील चित्रफीती त्यांना पाठविल्या, असा आरोप आहे.
मुलगी अस्वस्थ असल्याचे आईच्या लक्षात आले. त्यानंतर मेघवाडी पोलिसांत तक्रार करण्यात आली.