मुरबाड ( शंकर करडे) महाविकास आघाडी सरकार व घटक पक्ष यांनी पुकारलेल्या “महाराष्ट्र बंद” ला मुरबाड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पुकारलेला बंदला व्यापारी,दुकानदार आदीं उस्पुर्त प्रतिसाद दिला. यावेळी जि.प.उपाध्यक्ष .सुभाष पवार, रामभाऊ दळवी, रिपाइं(से) जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिह पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ सासे, शिवसेना तालुकाध्यक्ष कांतीलाल कंटे,लक्ष्मण खोळांबे, शिवसेना शहरप्रमुख राम दुधाळे, राष्ट्रवादी शहरअध्यक्ष दीपक वाघचौडे, काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष .नरेश मोरे, राष्ट्रवादी सेवादल जिल्हाध्यक्ष .जगन गायकर, दिलीप धनगर, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष सौ.संध्या कदम, पांडुरंग शिंगोळे, रवि केंबारी,नेताजी लाटे,विलास जाधव,जयवंत पवार, प्रशांत मोरे, शुभांगी भराडे आदीं पदाधिकारी उपस्थित होते.मुरबाड तालुक्यांतील सर्व शहर बाजारपेठ, सरळगाव, धसई, टोकावडे, म्हसा आदी शांततेने व उस्पुर्तपणे बंद केल्या होत्या.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी आज उत्तरप्रदेशतील घटनेबद्दल महाराष्ट्रात बंद का ? असे प्रश्न विचारणाऱ्यानां पुलवामा जम्मु हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानाच्या नावाने पुर्ण भारत देशामध्ये मतदान मागणारे प्रधानमंत्री हे ह्याच देशाचे असल्याची आठवण भाजपच्या उत्साही कार्यकर्तेंना दिली तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा ह्याचा राजीनामा जो पर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आंदोलने सुरू रहाणार असल्याचे सांगितले. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांचा व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध रविंद्र चंदने यांनी व्यक्त केला. बंदसाठी महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या तालुका-शहर पदाधिकारी यांनी मेहनत घेतल्याबद्दल व व्यापारी,दुकानदार यांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्याचे आभार .सुभाष पवार यांनी मानले.